जिल्हाधिकारी-कॅन्टोन्मेंट बोर्डलाही देणार निवेदन : लीजची मुदत वाढवून देण्यासाठी खासदारांकडे मागणी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना लिमिटेडला डिफेन्सने जागा खाली करण्यासाठी नोटीस बजावली होती. तसेच कब्जा घेण्यासाठीही अधिकारी गेले होते. पण 2 ऑगस्टपर्यंत स्थगिती असल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. आता संचालक मंडळाने युनियन जिमखाना मैदान बचाव ही मोहीम हाती घेतली असून सोमवारी रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी व कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे.
युनियन जिमखाना लिमिटेड येथे शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत संचालक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सचिव प्रसन्ना सुंठणकर यांनी युनियन जिमखान मैदान बचाव हा प्रस्ताव मांडला. तसेच निवेदन देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. त्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्त यांच्याकडे रॅलीबाबत परवानगीची मागणी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 8.30 वा. काढण्यात येणाऱया युनियन जिमखाना मैदान बचाव रॅलीत बेळगाव शहरातील सर्व क्रिकेटपटू, पालकवर्ग सहभाग घेणार आहेत. या रॅलीत मोठय़ा संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन युनियन जिमखाना संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.
डिफेन्सने अचानकपणे मार्च महिन्यात युनियन जिमखाना लिमिटेडला 1 कोटी 2 लाख रुपये भरून लीज वाढवून घ्यावी, असा आदेश बजावला होता. लॉकडाऊनच्या काळात गेली दोन वर्षे या मैदानावर कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरे भरविली गेली नाहीत. त्यामुळे सध्या जिमखाना युनियनकडे डिफेन्सला भरण्यासाठी पैसा नाही. या मैदानावर जी प्रशिक्षण शिबिरे भरविली जातात ती गरीब खेळाडूंसाठीच असतात. त्यामुळे मोठी रक्कमही त्या मुलांकडून घेतली जात नाही. अशा परिस्थितीत डिफेन्सने इतक्मया मोठय़ा रकमेची मागणी केल्याने युनियन जिमखाना संचालक मंडळाला धक्काच बसला
आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू, होतकरू व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी खेलो इंडिया योजना चालू केली आहे. पण एकीकडे खेळाला प्राधान्य दिले जात असताना दुसरीकडे शहरात असलेली मैदाने ताब्यात घेतली जात आहेत. त्यामुळे हे खेळाडू कोणत्या मैदानावर सराव करणार याबद्दलचा प्रश्न निर्माण झाला आहे. डिफेन्सने यापूर्वी ज्याप्रमाणे लीज वाढवून दिली होती, त्याचप्रमाणे यापुढेही लीज कमी दराने वाढवून मिळावी यासाठी जिमखाना संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे. मैदान बचावासाठी जिमखाना संचालक मंडळाने खासदार ईरण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी, खासदार प्रल्हाद जोशी यांच्याकडे समस्या मांडल्या आहेत. त्या समस्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे मांडू, असे आश्वासन देण्यात आले आहे.
यापूर्वी दोन मैदाने नष्ट
यापूर्वी बेळगाव कॅन्टोन्मेंट विभागात ग्लोब थिएटर बाजूला व रेल्वेस्थानकासमोर दोन मोठी मैदाने होती. त्या मैदानांवर मोठय़ा प्रमाणात हॉकी स्पर्धा भरविण्यात येत होत्या. याच मैदानांवर दोन ऑलिंपिकपटू घडले आहेत. पण कॅन्टोन्मेंटने या दोन्ही जागांवर आता क्वॉर्टर्स बांधून मैदाने नष्ट केली आहेत. आता त्यांचे लक्ष्य युनियन जिमखाना आहे. बेळगावच्या होतकरू क्रिकेटपटूंसाठी युनियन जिमखाना हे एकमेव मैदान असून हे मैदान गेल्यास क्रिकेट कोठे खेळावे, असा प्रश्न क्रिकेटपटूंना पडला आहे.
या बैठकीत संजय पोतदार, सुहास कुलकर्णी, विठ्ठल गवस, संजय मोरे, परशराम पाटील, मिलिंद चव्हाण, यतेंद्र देशपांडे, सचिन साळुंखे, महांतेश देसाई आदी उपस्थित होते.