लीजची मुदत वाढवून देण्याची मागणी : जिल्हा प्रशासनाने डिफेन्स-केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा आग्रह
प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखानामुळे अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. युनियन जिमखानावर क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, हॉकी यासह इतर खेळ खेळले जातात. गरिबांसाठी हे मैदान आवश्यक आहे. मात्र, अचानक मोठी रक्कम भरून लीज वाढवून घ्या, असे म्हणून नोटीस बजावणे तसेच कब्जा घेण्याचा प्रयत्न करणे हे योग्य नाही. त्यामुळे युनियन जिमखाना मैदान बचाव मोहीम हाती घेण्यात आली असून रॅली काढून याबाबत जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन लीज वाढवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
युनियन जिमखान्याचा बचाव होणे भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण या ठिकाणी विविध स्पर्धांचे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत कमी खर्चामध्ये स्पर्धकांना हे शिक्षण दिले जाते. तेव्हा याचा कोठे तरी विचार होणे गरजेचे आहे. या परिसरातील शालेय खेळाडूच नाही तर झोनल लेव्हल, महाविद्यालयांच्या आंतरराज्य स्पर्धा, जिल्हास्तरीय स्पर्धा दरवषी भरविल्या जातात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निसर्गरम्य असे हे मैदान आहे. तेव्हा युनियन जिमखाना कायमस्वरुपी राखीव म्हणून ठेवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
गरीब खेळाडूंसाठी मैदान महत्त्वाचे
प्रशिक्षक केवळ 150 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत फी घेऊन खेळाडूंना प्रशिक्षण देत असतात. इतक्मया कमी रकमेमध्ये शिक्षण मिळणे अवघड आहे. तेव्हा गरीब खेळाडूंसाठी हे मैदान महत्त्वाचे आहे. येथूनच कै. बंडू पाटीलसारख्या ऑलिम्पिकपटूंनी देशाला पदके मिळवून दिली आहेत. तेव्हा खेळाडूंसाठी युनियन जिमखान्याचे संरक्षण करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने डिफेन्स आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी युनियन जिमखाना प्रा. लि.चे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सेपेटरी प्रसन्न सुंठकर, संजय पोतदार, सुहास कुलकर्णी, संजय मोरे, विठ्ठल गवस, सचिन साळुंखे, महांतेश देसाई, यतेंद्र देशपांडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
बचावासाठी विविध संघटनांचा पाठिंबा
युनियन जिमखाना बचावासाठी बेळगावातील वेगवेगळय़ा संघ-संस्थांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विजया क्रिकेट अकादमी, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, आनंद क्रिकेट अकादमी, रॉजर्स क्रिकेट अकादमी, नीना क्रिकेट अकादमी यांच्यासह इतर संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या संघटनातील क्रिकेटपटूंनी सोमवारी जिमखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेऊन मैदान वाचविण्यासाठी आपण जिमखान्याच्या पाठिशी आहोत, असे सांगितले. रणजीपटू मिलिंद चव्हाण, आनंद करडी, प्रमोद पालेकर, सचिन साळुंखे, प्रशांत लायंदर, बॅडमिंटन प्रशिक्षक यतेंद्र देशपांडे, ज्ये÷ खेळाडू महम्मद ताहीर सराफ, राहुल नाईक, चंदन कुंदरनाड, प्रणय शेट्टी व पालक उपस्थित होते.