प्रतिनिधी / बेळगाव
युनिव्हर्सल ग्रुपच्यावतीने खडेबाजार पोलीस स्थानकातील पोलीस व कर्मचाऱयांसाठी 50 रेनकोट देण्यात आले. कोरोना काळात पोलीस सदैव सेवा बजावत आहेत. आता पावसाळा सुरू होईल, त्यावेळी पोलिसांना काम करणे सुसहय़ व्हावे यासाठी हे रेनकोट देण्यात आले. किशोर, विवेक, विनायक, यशवंत श्रेयकर यांनी हे रेनकोट वितरित केले. याप्रसंगी सर्वेश जवळकर, सूरजपाल, संयुक्त पाटील व ऋतिक काळे उपस्थित होते.