प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या काळात उत्तम सेवा दिलेल्या पोलिसांना युनिव्हर्सल ग्रुपतर्फे रेनकोटचे वाटप करण्यात आले. कॅम्प येथील बेळगाव साऊथ रहदारी पोलीस स्थानकामध्ये एकूण 30 पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. एसीपी शरणाप्पा यांच्याकडे रेनकोट सुपूर्द करण्यात आले.
यावेळी युनिव्हर्सल टेडर्सचे मालक विनायक श्रेयकर, कर्मचारी सर्वेश जवळकर, संयुक्त पाटील, ऋतिक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू मोरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच पोलीस स्थानकातील पोलीस श्रीधर, दानप्पा यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.