प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना योद्धा म्हणून कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱया सामाजिक कार्यकर्त्यांना युनिव्हर्सल ग्रुपच्यावतीने 100 पीपीई किट देण्यात आले. विविध कोविड केअर सेंटरमध्ये काम करणारे तसेच अनेक गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असणाऱया कोरोना योद्धय़ांना हे किट देण्यात आले.
युनिव्हर्सलतर्फे श्रीराम सेना, हेल्प फॉर निडी, म. ए. समितीचे कोविड केअर सेंटर, जिव्हाळा ग्रुप व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर संस्कार केलेल्या कार्यकर्त्यांना हे किट देण्यात आले. याप्रसंगी युनिव्हर्सल ग्रुपचे विनायक श्रेयकर, यशवंत श्रेयकर, राजू मोरे, सुनील मुरकुटे, संयुक्त पाटील, सर्वेश जवळकर, ऋत्विक कांबळे व सूरज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.