वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी श्रीनगरचा ‘युनेस्कोच्या क्रिटटिव्ह सिटीज नेटवर्क’मध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत यापूर्वी 246 शहरांचा समावेश होता. तर नव्या 49 शहरांना या यादीत युनेस्कोचे महासंचालक ऑद्रे अजॉले यांच्याकडून ‘विकासाच्या केंद्रात संस्कृती आणि रचनात्मकता कायम ठेवण्याची त्यांची प्रतिबद्धता आणि ज्ञान तसेच चांगल्या प्रथांची देवाणघेवाण करण्यासंबंधी’ मान्यता दिल्यावर सामील करण्यात आले आहे.
युनेस्कोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध एका पत्रकानुसार आता अशा शहरांचे संख्या 295 झाली असून ती 90 देशांमधील आहेत. या शहरांमध्ये संस्कृती, सृजनशीलता, हस्तशिल्प, लोककला, साहित्य, संगीत इत्यादींमध्ये निरंतर शहरी विकासासाठी गुंतवणूक केली जाते.
युनेस्कोसोबत सहकार्यासाठी भारतीय राष्ट्रीय आयोगाने या यादीत सामील करण्यासाठी श्ा़खाrनगरसह ग्वाल्हेरचे नाव सुचविले होते. श्रीनगरचे महापौर जुनैद आजिम मट्टू यांनी श्रीनगरला या प्रतिष्ठित यादीत सामील करण्यात आल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. या यादीत मुंबई आणि हैदराबाद यांचा ऑक्टोबर 2019 मध्ये समावेश करण्यात आला होता.