नवी दिल्ली
गेल्या डिसेंबर महिन्यात युपीआयअंतर्गतच्या देवाणघेवाणीच्या व्यवहाराने 223 कोटींची मर्यादा ओलांडली आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये युपीआय आणि भीम ऍपच्या माध्यमातून 130 कोटी देवाणघेवाण व्यवहार झाले होते. डिसेंबरमध्ये 4 लाख 16 हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. कोरोना काळात ऑनलाइन देवाणघेवाणीच्या व्यवहारात वाढ झाली आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये तर देवाणघेवाणीच्या व्यवहाराने विक्रमी स्तर गाठला आहे.