डॉक्टरांना करावी लागेल 10 वर्षे सेवा, मध्येच सोडल्यास दंडात्मक कारवाई
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये पीजी करणाऱया डॉक्टरांना किमान 10 वर्षे सरकारी नोकरी करण्याची सक्ती योगी आदित्यनाथ सरकारकडून करण्यात आली आहे. डॉक्टरांनी मध्येच नोकरी सोडल्यास त्यांना एक कोटी रुपये दंड भरावा लागेल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या वतीने यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला असून सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवला जात आहे. या आदेशामुळे सरकारी रुग्णालयांमधील तज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून निघेल असा दावा केला जात आहे. सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांसाठी 15 हजारहून अधिक पदे तयार केली गेली आहेत.