ऑनलाईन टीम / मुजफ्फरनगर :
उत्तर प्रदेशात कोरोनाचा संसर्ग काही थांबायचे नाव घेत नाही आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जनपदमध्ये केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांचे भाऊ जितेंद्र बालियान यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. जितेंद्र बालियान यांची नुसतीच कुटबी गावाचे गावप्रमुख म्हणून निवड झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत निवडणुकीच्या दरम्यान, ते आणि त्यांचे भाऊ राहुल बालियान यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघांवर हृषिकेश एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच आज सकाळी उपचारा दरम्यान, जितेंद्र बालियान यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. तर राहुल बालियान हे सध्या व्हेंटिलेटर असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.