- मास्क नाही घातल्यास 1 हजार रुपये दंड
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात वाढत चाललेली कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेत शुक्रवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता पूर्ण प्रदेशात रविवारी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही आहे.
तसेच या दिवशी प्रदेशातील प्रमुख ठिकाणी सॅनिटायझेशन केले जाणार आहे. यासोबतच जर आपण मास्क घातला नसेल तर एक हजर रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. आणि आपण जर मास्क घातल्याशिवाय दुसऱ्यांदा पकडले गेल्यास 10 हजार रुपये दंड घेतला जाणार आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, लखनऊमध्ये 1 हजार बेड असलेले नवे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोविड टेस्टसाठी सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळा पूर्णपणे सहकार्य करतील.