ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखांपेक्षा कमी झाली आहे. प्रदेशात सद्य स्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 94,482 इतकी आहे.
उत्तर प्रदेशात मागील 24 तासात कोरोनाचे 6,046 नवे रुग्ण आढळून आले. तर 17,540 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला अशी माहिती आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली. पुढे ते म्हणाले, 24 एप्रिलच्या तुलनेत प्रत्येक दिवशी होणाऱ्या वाढीमध्ये 82.2 % घट झाली आहे. युपी : मागील 24 तासात 6,046 नवे कोरोना रुग्ण