ऑनलाईन टीम / लखनऊ :
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत प्रदेशात निःशुल्क खाद्यान्नाचे वितरण 20 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त खाद्य आणि रसदकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत. आयुक्त खाद्य रसद मनीष चौहान यांनी गुरुवारी सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून निर्देश जारी केले आहेत.
यामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या या टप्प्यात निःशुल्क रेशन वितरित केले जाणार आहे. याची सुरुवात 20 मे पासून होणार असून हे अभियान 31 मे पर्यंत चालणार आहे. तसे पाहिले तर प्रदेश सरकार जून महिन्यातही हे वितरण करण्याच्या तयारीत आहे. तरी देखील सद्य स्थितीत 31 मे पर्यंतच वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच अंत्योदय किंवा गृहस्थी रेशन कार्ड धारकांना प्रति युनिट 5 किलो ग्रॅम रेशन वितरित केले जाणार आहे. वितरणाच्या काळात कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. रेशन दुकानात एका वेळी केवळ पाच लाभार्थ्यांनाच परवानगी दिली जाणार आहे.