अनेक डोसची गरज
कोरोना लस एकाचवेळी संसर्ग बरा करू शकणार नाही. सद्यकाळात निर्मिल्या जाणाऱया लसी एकाचवेळी संसर्ग संपवू शकतील असे वाटत नाही. लोकांना संसर्गातून बरे होण्यासाठी एकापेक्षा अधिक लसीचे डोस घ्यावे लागू शकतात, असे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एम्हटले आहे. गेट्स फौंडेशनने लसनिर्मितीसाठी 300 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे.
ब्राझील : गडद संकट
ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 67 हजार 960 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचा एकूण आकडा आता 22,31,871 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिवसभरात 1,284 बाधित दगावले आहेत. देशात आतापर्यंत 82,890 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. अमेरिकेनंतर ब्राझील हा जगातील सर्वात संकटग्रस्त देश ठरला आहे.