वृत्तसंस्था/. लंडन
2019-20 चा युरोपियन फुटबॉल हंगाम ऑगस्ट महिन्यात संपविण्यासाठी युफाने एक वेगळा आराखडा आखला आहे. या युरोपियन फुटबॉल हंगामामध्ये चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीग फुटबॉल स्पर्धांचा समावेश असल्याचे युरोपियन फुटबॉल नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिफेरीन यांनी सांगितले.
कोरोना महामारी संकटामुळे युरोपियन लीग फुटबॉल हंगाम मार्चपासून स्थगित करण्यात आला आहे. येत्या काही आठवडय़ामध्ये काही लीग स्पर्धा पुन्हा सुरू करण्याबाबत युफाने नवी योजना तयार केली आहे. गेल्या शनिवारपासून जर्मन बुंदेस्लीगा फुटबॉल स्पर्धेला पुन्हा फेर सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय लीग फुटबॉल स्पर्धेचा 80 टक्के हंगाम पूर्ण करण्यासाठी युफाचे प्रयत्न चालू आहेत, असेही सिफेरीन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.