वृत्तसंस्था/ म्युनिच
यावर्षी होणाऱया युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांसाठी स्पर्धा आयोजकांनी 14 हजार शौकिनांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. बेव्हेरियन राज्य शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आल्याने आता म्युनिचच्या ऍलियान्झ एरेना येथे या स्पर्धेतील सामन्यावेळी प्रेक्षकांच्या उपस्थितीवर मर्यादा राहिल.
अलीकडच्या कालावधीत म्युनिचमध्ये कोरोनाबाधित रुग्ण काही प्रमाणात आढळल्याने खबरदारीचे उपाय म्हणून स्पर्धा आयोजकांनी तसेच बेव्हेरियन राज्य शासनातर्फे प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. म्युनिचच्या ऍलियान्झ स्टेडियममध्ये फ गटातील जर्मनीचे तीन सामने खेळविले जाणार आहेत. यापैकी पहिला सामना यजमान जर्मनी आणि विश्वविजेता फ्रान्स यांच्यात 15 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 19 जूनला जर्मनीचा दुसरा सामना पोर्तुगालबरोबर आणि तिसरा सामना 23 जूनला हंगेरीबरोबर होणार आहे. म्युनिचच्या या स्टेडियमवर या स्पर्धेतील एक उपांत्य फेरीचा सामनाही खेळाविला जाणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे युरो 2020 फुटबॉल स्पर्धा एक वर्षासाठी लंबणीवर टाकण्यात आली होती. आता ही स्पर्धा 11 जून ते 11 जुलै दरम्यान खेळविली जाणार असून जर्मनीतील 11 विविध शहरांमध्ये स्पर्धेतील सामने आयोजित केले आहेत.