प्रतिनिधी/बांदा-
इन्सुली बिलेवाडी मधील जिल्हा परिषद शाळा नजीक भरवस्तीत लावलेल्या सौर दीव्याची बॅटरीची चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला. तसेच नजीकच्या घरात घुसण्याचा प्रयत्नही केला. मात्र बिलेवाडी युवकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला. शिमगोत्सवाचे कार्यक्रम सुरु असल्याने त्याचा फायदा घेत सोमवारी रात्री 11 च्या सुमारास जिल्हा परिषद शाळेकडील सौर दिव्याची बॅटरी चोरत असताना तेथील युवक अमेश कोठावळे गेला असता तेथुन चोरट्यानी दुचाकीने बॅटरी तेथे टाकून पळ काढला. युवकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते फरार झाले.दरम्यान परबवाडी येथील अमोल शिरोडकर हे बिलेवाडी येथून परतत असताना त्यांना एक दुचाकी दिसली होती मात्र शिमगोत्सव असल्याने त्यांनी त्यांना काही विचारपूस केली नाही. दरम्यान चोरट्यानी एका घरात घुसण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता असे अमेश कोठावळे यांनी सांगितले. तर पोलिसांनी गस्त घालून लवकरात लवकर चोरट्याना ताब्यात घ्यावे अशी मागणी होत आहे