आत्महत्येस कारणीभूत असणाऱयांवर कारवाईची कुटुंबियांची मागणी : अखेर चौघा संशयितांवर गुन्हा दाखल : कनेडी येथील घटना
कणकवली / कनेडी:
कनेडी-बाजारपेठ येथील मोतेस फिलीप डिसोजा (23) याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याच्या घटनेला वेगळे वळण प्राप्त झाले. मोतेस याचे वडील फिलीप मोतेस डिसोजा (51, कनेडी – बाजारपेठ) यांनी कणकवली पोलीस स्थानकात धाव घेत, मोतेस याला बॅनी डिसोजा (सध्या रा. कनेडी) व भिरवंडे येथील तिघांनी मारहाण केली होती. तसेच पुन्हा मारण्याची धमकी दिली होती. परिणामी घाबरलेल्या मोतेस याने गळफास घेतला, अशी फिर्याद दिली. त्यानुसार, बॅनी डिसोजा व अन्य तिघे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोतेसचे वडील फिलीप डिसोजा यांच्या फिर्यादीनुसार, मोतेस हा गोवा – पणजी येथे हाऊसकिपिंग म्हणून कार्यरत होता. डिसेंबर 2019 ला तो कनेडी – बाजारपेठ येथे आला, तेथून परत पणजी येथे गेलाच नव्हता. क्रिकेटची आवड असल्याने तो नेहमी कनेडी बाजारपेठ येथील मुलांसमवेत कनेडी – डिमरीचे माळावर क्रिकेट खेळण्यासाठी जात असे.
क्रिकेट खेळण्यास गेला होता
22 एप्रिलला सायंकाळी चार वा. च्या सुमारास मोतेस हा क्रिकेट खेळायला निघून गेला. तर सायंकाळी सहा वा. च्या सुमारास मोतेसचे वडील फिलीप यांच्या शेजारी राहणाऱया छोटय़ा मुलाने फिलीप यांच्याकडे येऊन ‘काहीजण मोतेस याला मारत आहेत’ असे सांगितले. ते ऐकून फिलीप व त्यांची पत्नी डिमरीच्या माळावर गेले. तेथे बॅनी डिसोजा (सध्या रा. कनेडी) व भिरवंडे येथील तिघेजण होते. तसेच क्रिकेट खेळणारे कनेडी बाजारपेठ येथील सुमारे 15 मुले होती. मोतेस बसला होता व क्रिकेट खेळणारे तेथे गोळा झाले होते. मोतेसच्या अंगावरील कपडे फाटले होते. अंगावर मुका मार दिल्याच्या खुणा होत्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाण झाल्याचा आरोप
त्याचवेळी बॅनी डिसोजा याने, ‘21 एप्रिलला डिवाईन घोन्साल्वीस (रा. सांगवे – घोसाळवाडी) व मोतेस यांनी भिरवंडे येथे जाऊन एका घराचे दार उघडले, कौले काढली’, असे फिलीप यांना सांगितले. फिलीप यांनी मोतेस याला विचारणा केली असता त्याने, आपण डिवाईन याच्यासोबत भिरवंडे येथे गेलो नव्हतो. बॅनी डिसोजा व त्याच्यासोबतच्या तिघांनी मोतेस व डिवाईनला हाताच्या ठोशाने मारहाण केली, असे फिलीप यांना तेथे समजले. याचवेळी डिसोजा याने ‘डिवाईनने आम्हाला मंगेश नाव सांगितले. पण, आम्हाला मोतेस असे ऐकायला आले. म्हणून आम्ही दोघांना मारले’ असे सांगितले.
पुढे बेपत्ता अन् मृतदेह सापडला
पुढे तेथे आलेला फिलीप यांचा दुसरा मुलगा जॉर्ज हा मोतेस याला हाताला धरून घेऊन जात होता. मात्र, मोतेस हा जॉर्जचा हात झटकून अंधारातून पळून गेला. तो रात्रभर घरीच आला नव्हता. दुसऱया दिवशी म्हणजे 23 एप्रिलला फिलीप व त्यांचे नातेवाईक यांनी मोतेसचा सांगवे, कनेडी तसेच इतर नातेवाईकांकडे शोध घेतला. तसेच तिसऱया दिवशी, 24 एप्रिललाही मोतेसचा सकाळी 4.30 वा. पासून शोध सुरू केला. यात दुपारी 3.30 वा. च्या सुमारास जॉर्ज याला मोतेस हा सांगवे – कनेडी विठ्ठल मंदिराच्या पाठीमागील जंगलात मल्हारी नदीच्या बाजूला असलेल्या रतांब्याच्या झाडाला दोरीला लटकलेल्या स्थितीत दिसून आला. पुढे तेथे आलेल्या पोलिसांनी मोतेसचा मृतदेह खाली उतरविला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
चौघांवर गुन्हा दाखल
फिर्यादीनुसार, मोतेस हा कनेडी – बाजारपेठ येथील मुलांसमवेत क्रिकेट खेळत असतानाही, त्याने एकासमवेत भिरवंडे येथील एका घराचा दरवाजा उघडून, कौले काढली असल्याच्या संशयाने त्याला बॅनी डिसोजा व भिरवंडे येथील तिघांनी बेदम मारहाण करून पुन्हा मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून जाऊन मोतेस याने गळफासाने आत्महत्या केली, त्यानुसार बॅनी डिसोजा व अन्य तिघे अशा चौघांविरोधात भादंवि कलम 306, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत. या चारही संशयितांचा पोलिसांनी शोधही घेतला. मात्र, ते शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत सापडले नव्हते.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
दरम्यान, मोतेस याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्यानंतर तो विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. जोपर्यंत त्याला मारहाण करणाऱयांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. याबाबत पोलिसांनीही कनेडी येथे धाव घेतली होती. मात्र, शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत डिसोजा कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. मात्र, गुन्हा दाखल झाला असून संशयितांवर कारवाई करण्यात येईल, अशी समजूत काढल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीय तयार असल्याचे पोलिसांनी सायंकाळी उशिरा सांगितले. rtb.openx.net:443″:{“supports_spdy”:true}},{“46f728da3a1c12d3ab8c868bc90e2ec9.safeframe.googlesyndication.com:443”:{“supports_spdy”:true}},{“u.openx.net:443”:{“supports_spdy”:true}},{“dmp.brand-di