वार्ताहर / विजापूर
अरकेरी तांडा-2 येथील युवक संतोष अलियास सुक्की धर्मू जाधव (वय 31) याच्या हत्येप्रकरणी सहा संशयित आरोपींना सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूतनाळ तलावाजवळ 10 जून रोजी सायंकाळी संतोषची अज्ञातांनी हत्या केली होती. याप्रकरणी जिल्हा पोलीसप्रमुख अनुपम अगरवाल व अतिरिक्त पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी के. सी. लक्ष्मीनारायण, ग्रामीण सर्कलचे सीपीआय महांतेश द्यामणावर, पीएसआय आनंद ठक्कणावर विजापूर ग्रामीण यांनी आज निडगुंडी गावाजवळ 1) सुरेश लारा सीतु राठोड (वय 37), अरकेरी तांडा नं-2., 2) संतोष श्यामु पवार (वय 27) अरकेरी तांडा नं-2 सध्या रा. पवार वस्ती, 3) सुनील पापु पवार (वय 19), 4) अनिल बाबु पवार (वय 19) अरकेरी तांडा नं-2, 5) रवी अरविंद राठोड (वय 28), क्मयातनकेरी तांडा, 6) चंद्रशेखर विठ्ठल राठोड (वय 38), अरकेरी, तांडा नं-6, सध्या रा. विजापूर सेवालाल नगर यांना अटक केली.
या आरोपीनी हत्येच्या वेळी वापरलेल्या दोन मोटार सायकली, चाकू व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. या हत्येची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती.