सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर दुचाकीवरुन निघालेल्या युवकास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मारुती सुझकी कार (क्रमांक एम. एच. 12 जे. एम. 9629) वरील चालक (नाव माहिती नाही) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 8 ऑगस्ट रोजी शुभम अरुण कांबळे (वय 26, रा. तामजाईनगर, सातारा) हा युवक रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरुन तामजाईनगरकडे निघालेला असताना त्याला कार (क्रमांक एम. एच. 12 जे. एम. 9629) या कारने धडक दिली. या अपघातात शुभम कांबळे याच्या डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत युवकाचे चुलते विजय कांबळे यांनी कार चालकाविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सहाय्यक फौजदार साबळे करत आहेत.