प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने भाजपचे उपप्रदेशाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्याबाबत अपमानास्पद बॅनर वापरुन निंदनीय प्रकार केला आहे. तसेच भाजपचे चिन्ह असलेले कमळ काळÎा रंगात उलटे दाखवून एका राष्ट्रीय पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या पदाधिकाऱयांवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दोन दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेल्या आंदोलनामध्ये बॅनरबाजीचा केलेला प्रकार निंदनीय आहे. बॅनवर भाजप आणि सोमैय्यां यांच्याबाबत वापरलेला मजकूर अक्षेपार्ह आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते.