इचलकरंजी / प्रतिनिधी
अल्पवयीन युवतीने टेडी बिअर देण्यास नकार दिल्याने तिला शारिरीक व मानसिक त्रास देत, ठार मारण्याची धमकी देवून, तिला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी इचलकरंजीतील मंगळवार पेठेमधील युवकास दोषी धरुन, न्यायालयाने दहा वर्षाची सक्त मजुरी आणि ६१ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. बी. शेळके यांनी सुनावली.
तोहिम अमीन लाटकर ( रा. मंगळवार, इचलकरंजी) असे आरोपीचे नाव आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून एच. आर. सावंत, भोसले यांनी काम पाहिले. या खटल्याचा गुन्हा गावभाग पोलिसात दाखल झाला होता. तर याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सुळ यांनी केला होता.