चंदीगड :
कोरोनविरुद्ध लढण्यासाठी टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगनेही पुढाकार घेतला आहे. रविवारी त्याने पंतप्रधान सहायता निधीसाठी 50 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. देशातील संपूर्ण लोक जोपर्यंत एकत्र होत नाही, तोपर्यंत आपण ही लढाई जिंकू शकत नाही. सर्व नागरिकांनी एकत्र येत कोरोनाला पराभूत करायचे आहे, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना मांडल्या आहेत.