ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तीन मे पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. तसेच मोदींनी आर्थिक मदतीचे देखील आवाहन केले. मोदींच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या या लढ्यात माजी क्रिकेटर युवराज सिंग देखील मदतीसाठी पुढे आला आहे.
युवराज सिंग ने दिल्ली सरकारला 15 हजार एन-95 मास्कची मदत देऊ केली आहे.
या मदतीबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत आभार मानले आहेत. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, युवराज तुमच्या या मदतीसाठी दिल्ली आभारी आहे.या मास्क चा वापर रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि नर्सेस करतात. यासाठी दिल्ली सरकारने केंद्राकडे मदत मागितली होती.
युवराज ने देखील मदत केल्यावर ट्विट करत म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या या लढ्यात हेल्थ केअर प्रोफेशनमध्ये काम करणारेच खरे हिरो आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मदत करताना आनंद होत आहे.