प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त सातारच्या युवा ग्रामविकास सामाजिक सेवा संस्था, बुधरानी हॉस्पिटल पुणे, आणि उम्मीद फाऊंडेशन सातारा यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर साताऱयातील आकाशवाणी झोपडपट्टी व मतकर झोपडपट्टी परिसरात पार पडले. सामाजिक बांधिलकीतून आपले आरोग्य आपली जबाबदारी या उपक्रमांतर्गत शिबिरामध्ये नागरिकांच्या डोळ्याची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना अल्प दरात चष्मा देण्यात आले. या शिबिरासाठी आकाशवाणी झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
एकूण 210 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आले. तसेच डोळ्याच्या पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य केले जाणार आहे. युवाग्रामचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या पुढाकारातून सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत हा कार्यक्रम पार पडला. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेणकर उपस्थित होत्या. परिसरातील तपासणी केलेल्या निदान झालेल्या गरजू लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे, अशी माहिती बुधराणी हॉस्पिटलचे समन्वयक डॉ. सागर लेंभे यांनी दिली. उम्मीद फाउंडेशन अध्यक्षा अफसाना देवानी, खादी ग्रामोद्योग चेअरमन अरुण पवार, युवाग्राम संस्थेचे संचालक अमोल मेणकर, तुषार फल्ले, बाळासाहेब खुडे, विद्या गडकरी, मनोज जगताप, अंजना खुडे, अनिता पोटोळे, प्रदिप सोनवणे, उषा गायकवाड, रूपा अडागळे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.