प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाकाळात गरीब व गरजू व्यक्तींच्या अन्नधान्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वृद्ध यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये, यासाठी एक हात आपुलकीचा या संकल्पनेतून युवासेनेचे कार्यकर्ते काम करत आहेत. या उपक्रमाला बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने मदत देण्यात आली आहे.
मागील 15 दिवसांपासून युवासेनेच्या माध्यमातून फूड पॅकेट्स तयार करून गरजूंपर्यंत पोहोचविले जात आहेत. या उपक्रमाची अनेकांनी दखल घेऊन युवासेनेला आर्थिक मदत व साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांचा 46 वा वाढदिवस तर साईश सागर नागनुरी याच्या 5 व्या वाढदिवसानिमित्त अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, जिल्हा संघटक दत्ता जाधव, शहरप्रमुख दिलीप बैलुरकर, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, नारायण चैत्राणी, पिसाळे, स्वरा नागनुरी, सूरज गायकवाड, आकाश गायकवाड, दिनेश आनंदाचे, कल्लाप्पा परीट यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेतर्फे महेश मजुकर व संकेत लोहार यांनी आभार मानले.