प्रतिनिधी / बेळगाव
युवासेना बेळगाव यांच्यावतीने एक हात आपुलकीचा या संकल्पनेतून गोरगरिबांना आणि विलगीकरणात असलेल्या व्यक्तींना रोज जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात असलेल्या नागरिकांना मदतीचा हात दिल्यामुळे या उपक्रमाला शिवसेना बेळगाव तालुक्मयाच्या पदाधिकाऱयांनी आणि विश्वास फाउंडेशनच्या संचालकांनी भेट देऊन या कार्याची प्रशंसा केली. तसेच या कार्यासाठी त्यांना साहित्य आणि टी-शर्ट उपलब्ध करून दिले.
कोरोनाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे या दुसऱया लाटेच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात गोरगरिबांचे आणि रुग्णांचे हाल होत असल्याने त्यांना युवा सेनेच्यावतीने मदत दिली जात आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भेट घेऊन साहित्याच्या रुपात मदत देण्यात आली. यावेळी शिवसेना बेळगाव जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले, तालुका उपप्रमुख पिराजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, विश्वास फाऊंडेशनचे संचालक नागराज गडगण्णवर, सचिन चंदगडकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, युवासेना बेळगावचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मजुकर यांनी केले. विनायक हुलजी व राधेश शहापूरकर यांनी आभार मानले.