जनरिक आधार फार्मसी कंपनीची 50 टक्केची खरेदी करणार
वृत्तसंस्था/ मुंबई
टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मुंबईमधील जनेरिक आधार फार्मसीमधील 50 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यात आली आहे. या कंपनीचे संस्थापक 18 वर्षाचे अर्जून देशपांडे आहेत. अन्य ऑनलाईन फार्मसीच्या तुलनेत जेनरिक आधार आपली औषध बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कमी विकली जाते. असे स्पष्टीकरण देशपांडे यांनी यावेळी दिली आहे.
रतन टाटा यांनी तीन ते चार महिन्यांच्या अगोदर बिजनेस टायकूनचा प्रस्ताव ऐकला होता. त्याच्या आधारे टाटा यांनी हातमिळवण्यासाठी रुची दाखवली असून त्यांनी या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्याबाबतची गुंतवणुकीच्या व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले आहे.
किरकोळ व्यापाऱयांना नफा
देशपांडे यांच्या जेनरिक आधार कंपनीची सुरुवात दोन वर्षापूर्वी केली आहे. त्यावेळी देशपांडे हे 16 वर्षाचे होते. त्या कालावधीत त्यांची कंपनी प्रत्येक वर्षाला 6 कोटी रुपयाच्या महसूलाची कमाई करत असल्याचा दावा केला आहे. ही कंपनी स्टार्टअप युनिक फार्मसी ऍग्रीगेटर व्यवसायाचे मॉडेलचा फॉलो केला जात आहे. याच्या आधारे कंपनी किरकोळ व्यापाऱयांना आपल्या औषधांची विक्री करते.
विविध स्टार्टअपमध्ये गुंतवणूक रतन टाटा यांनी या अगोदर यासारख्या खासगी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. परंतु ही गुंतवणूक टाटा समूहाशी जोडलेले नसल्याचे म्हटले आहे. प्रामुख्याने टाटा यांनी पेटीएम, स्नॅपडील, क्मयोरफिट, अर्बन लॅडर, लेंसकार्ट आणि लायब्रेट आदी स्टार्टअपचा समावेश आहे.