वार्ताहर / नंदगड
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने तिवोली येथील नागरिकांना मास्कचे वितरण करण्यात आले. मास्क वितरणावेळी सीमालढय़ातील ज्ये÷ कार्यकर्ते गोपाळ हेब्बाळकर यांनी खानापूर युवा समितीतर्फे सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच यापुढे खानापूर तालुक्मयातील म. ए. समिती, मराठी भाषिक व युवकांनी एकत्र येत सीमालढय़ाला बळकटी द्यावी, असे मत व्यक्त केले.
गावातील सर्व नागरिकांना मास्कचे वितरण केले. यावेळी युवा समितीचे किशोर हेब्बाळकर, ग्रा. पं. माजी सदस्य सहदेव हेब्बाळकर, पोमानी नाळकर, कृष्णा गोरल, महादेव सुतार, महेश हेब्बाळकर, सिद्धाप्पा हेब्बाळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.