बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. 6 मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मातृभाषेमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यादृष्टीने युवा समिती हा उपक्रम राबवीत आहे. युवा म. ए. समितीचे पदाधिकारी प्रतीक पाटील यांनी या उपक्रमाविषयी माहिती देत मागील वषीपेक्षा यावषी मातृभाषेत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका जयश्री पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपणही शिक्षकांच्यावतीने या उपक्रमाला मदत करू असे सांगितले. शिक्षक रामलिंग बाबर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नंदा बसुर्तेकर, एस. जी. पाटील, सविता निंगण्णावर, भुवनेश्वरी मंतुर्गीमठ, युवा समितीचे अविनाश हलगेकर, प्रतीक पाटील, ओमकार पाटील, आनंद पाटील यासह इतर उपस्थित होते.
Previous Articleश्रीराम मंदिरच्या उभारणीसाठी भूमिपूजन
Next Article सुस्थितीत असलेल्या रस्त्याची खोदाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.