प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने सर्वम बाळेकुंद्री याला आर्थिक मदत देण्यात आली. 15 महिन्यांच्या सर्वमला दुर्मीळ असा स्पायनल मस्क्मयुलर एट्रोपी आजार झाला असून, त्याच्या उपचारासाठी 16 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. बेळगावमधील गणेशोत्सव मंडळे, शिवजयंती उत्सव मंडळे, युवक, महिला मंडळांनी खारीचा वाटा उचलत सर्वमला मदत करावी, असे आवाहन शुभम शेळके यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, राजू कदम, करण केसरकर, आकाश भेकणे यांच्यासह इतर उपस्थित होते.