बेळगाव : येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून कोरोनाकाळात विविध प्रकारची मदत होत आहे. एका कोरोना रुग्णाची मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. दरम्यान, सदर बाब युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना समजली. कार्यकर्त्यांनी तातडीने दाखल होऊन त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यासाठी मदत केली. शिवाय हॉस्पिटलमध्ये बेडदेखील मिळवून दिला. संबंधित व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यानंतर परत घरी सोडण्यासाठीही मदत केली. यासाठी संकेत लोहार, अवधुत कंग्राळकर, राधेश शहापूरकर, सौरभ यांचे सहकार्य लाभले.
Previous Articleअकरावीसाठी होणार ऑनलाईन परीक्षा
Next Article समर्थनगर येथील माउली ग्रुपतर्फे अन्नधान्य वाटप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.