बेळगाव : बेळगावमध्ये कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. परंतु योग्य प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी युवा सेनेने एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्याकडे बेळगावला कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी बेळगावच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता. युवा सेनेने 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यापैकी एक मशीन बेळगावला देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावकरांना ऑक्सिजनची समस्या भासणार नाही. यामुळे युवा सेनेच्या पदाधिकाऱयांनी शिवसेना पदाधिकाऱयांचे आभार मानले आहेत.
Previous Articleमुतगा येथे औषध-गोळ्य़ांचे वाटप
Next Article कंग्राळी खुर्दमध्ये 71 जण कोरोनाबाधित
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.