ऑनलाईन टीम / अबु धाबी :
संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजानच्या इफ्तार पार्ट्यांवर बंदी घातली आहे.
मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्यात यूएईमध्ये घर आणि ऑफिसमध्ये इफ्तार पार्टी देण्यात येते. मात्र, देशातील वाढती कोरोना संख्या लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोना निर्बंधानुसार या इफ्तार पार्ट्यांवर बंदी घातली आहे. रेस्टॉरंटमधील अथवा हॉटेलमधील इफ्तारचे जेवण दुसर्यांना वाटण्यास मनाई करण्यात आली आहे.