वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचने एका सेटची पिछाडी भरून काढत कॅनडाच्या मिलोस रेऑनिकचा पराभव करून एटीपी वेस्टर्न अँड सदर्न ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याचा फॉर्म पाहता सोमवारपासून सुरू होणाऱया यूएस ओपनचा तोच संभाव्य विजेता असल्याचे मानले जात आहे.
जोकोविचने अंतिम लढतीत रेऑनिकवर 1-6, 6-3, 6-4 अशी मात केली. 33 वर्षीय जोकोविचचे हे कारकिर्दीतील 80 वे विजेतेपद असून रेऑनिकविरुद्धचा हा सलग 11 वा विजय आहे. याशिवाय या वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम जिंकणाऱया जोकोविचचा हा या मोसमातील सलग 23 वा विजय आहे. एटीपी मास्टर्स सिरीजमधील त्याचे हे 35 वे जेतेपद असून त्याने राफेल नदालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.