प्रतिनिधी/ पुणे
यूटीआय म्युच्युअल फंडातर्फे मार्केट कँपमध्ये जास्तीत जास्त 30 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणारी ‘यूटीआय फोकस्ड इक्विटी फंड’ ही ओपन एन्डेड इक्विटी योजना सादर करण्यात आली आहे. ही नवीन फंड योजना खुली झाली असून, 18 ऑगस्ट 2021 रोजी बंद होत आहे. ही योजना 26 ऑगस्ट 2021 पासून गुंतवणूक आणि निर्गुंतवणूक यासाठी पुन्हा खुली होईल.
मार्केट कॅपमध्ये जास्तीत जास्त 30 शेअर्समध्ये इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घ मुदतीचे भांडवल उभारणे, हे या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट आहे. असे असले, तरी हे गुंतवणूक उद्दिष्ट साध्य होईलच, याची खात्री देता येऊ शकत नाही.
या योजनेचे फंड व्यवस्थापक सुधांशू अस्थाना म्हणाले, सुयोग्य निवड करणे, हे निश्चित उद्दिष्टासाठीच्या गुंतवणुकीचे गमक आहे आणि एक कणखर, सक्षम पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी आम्ही दुहेरी आयाम असलेले सूत्र अनुसरणार आहोत. उपलब्ध असलेल्या अफाट पर्यायांमधून अतिशय मोजक्मया कंपन्यांची यादी निवडणे, हा पहिला आयाम आहे. आजवरच्या समृद्ध संशोधन अनुभव आणि फंड व्यवस्थापनाचे पाठबळ लाभलेल्या आमच्या स्कोअर अल्फा, या खास गुंतवणूक तत्त्वज्ञानावर हा पहिला आयाम आधारलेला आहे. दुसरा आयाम हा प्रत्येक कंपनीमध्ये लक्षणीय पोर्टफोलिओची उभारणी करून त्याद्वारे गुंतवणूकदाराला मिळणाऱया परताव्याला सुयोग्य चालना देणारा असेल.