प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये बेळगाव जिल्हय़ातील चौघे चमकले आहेत. मंगळवारी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, बेळगावच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अथणी तालुक्यातील जगदीश अडहळ्ळी यांनी परीक्षेत 440 वी रँक घेतली आहे. सध्या ते कर्नाटक सरकारच्या महसूल विभागात सह आयुक्त म्हणून सेवा बजावित आहेत. रायबाग कुडची येथील गजानन बाळे यांनी 663 वी रँक मिळवून यश संपादन केले आहे. हुक्केरी तालुक्मयातील यरनाळ गावचे प्रफुल्ल देसाई यांनी 532 वी रँक मिळविली आहे. तर चिकोडी येथील प्रियांका कांबळे यांनी 670 वी रँक मिळविली आहे.
यूपीएससी ही देशातील अत्यंत खडतर अशी परीक्षा म्हणुन ओळखली जाते. लोकसेवा आयोगामार्फत देशातील क्लासवन अधिकाऱयांच्या नेमणूका या द्वारे करण्यात येतात. दरवषी लाखो विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होतात. परंतु यातील मोजक्मयाच विद्यार्थ्यांना यश मिळते. यापूर्वीही बेळगावमधील अनेक विद्यार्थ्यांनी यूपीएससीमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सध्या देशातील विविध भागामध्ये मोठय़ा हुद्यावर ते सेवा बजावित आहेत.