ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) पथकाने आज दिल्लीच्या शाहीन बाग येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयावर छापा टाकला. बंदी असलेल्या या संस्थेच्या इतर कार्यालयांवरही छापेमारी सुरू आहे.
शाहीन बाग कार्यालयावरील छाप्यादरम्यान यूपी एसटीएफकडून अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. मथुरेतील मंत येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या चौकशीच्या हेतूने हा छापा टाकण्यात आला आहे.
या गुन्ह्याप्रकरणी पीएफआयच्या स्टुडंट युनिटचा सदस्य रौफ शरीफ याला केरळमध्ये यूपी एसटीएफने ताब्यात घेतले असून, प्रोडक्शन वॉरंटवर त्याला दिल्लीत आणले आहे. त्याचीच चौकशी या छाप्यादरम्यान सुरू आहे.