नवी दिल्ली
एएफसी यू-16 चॅम्पियनशिपचा गुरुवारी ड्रॉ जाहीर करण्यात येणार असून भारताचे नाव तिसऱया पॉटमध्ये ठेवण्यात आले आहे. कौलालंपूरमधील एएफसी हाऊसमध्ये हा ड्रॉ काढण्यात येणार आहे.
ताश्कंदमध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेतील गट ब मध्ये यू-16 भारतीय संघाने अग्रस्थान मिळवित या अंतिम स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. भारतीय संघाने 3 सामन्यांतून 7 गुण मिळविताना एकूण 10 गोल केले तर फक्त एक गोल प्रतिस्पर्ध्याला दिला होता. भारताच्या गटात यजमान उझ्बेकिस्तान, बहरिन, तुर्कमेनिस्तान यांचाही समावेश होता. यू-16 एएफसी अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची भारताची ही सलग तिसरी व एकंदर नववी वेळ आहे. भारतीय संघ सध्या आठ आंतरराष्ट्रीय सामन्यात अपराजित राहिला आहे. या वर्षी ही स्पर्धा बहरिनमध्ये होणार आहे.