वृत्तसंस्था/ जमशेदपूर
येथे सुरू झालेल्या यू-18 मुलींच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली असून पहिल्याच सामन्यांत त्यांनी नेपाळचा 7-0 असा धुव्वा उडविला.
भारताचा पुढील सामना 19 मार्च रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारताचे गोल प्रियांका सुजीश (15 वे मिनिट), लींडा कोम (15 व 35), अपूर्णा (69), पूर्णिमा (77), सुनीता मुंडा (87), नीतू लींडा (96 वे मिनिट) यांनी नोंदवले. भारताने या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले होते. लींडा कोमला हॅट्ट्रिक नोंदवण्याची संधी 42 व्या मिनिटाला मिळाली होती. पण तिचा फटका गोलपोस्टच्या बाजूने बाहेर गेल्याने ही संधी हुकली.