वृत्तसंस्था/ मेलबर्न
पुढील महिन्यात वेस्ट इंडीजमध्ये होणाऱया 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने 15 सदस्यीय संघाची घोषणा मंगळवारी केली.
गेल्या आठवडय़ात ऍडलेडमध्ये घेण्यात आलेल्या चाचणी सामन्यानंतर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कूपर कॉनोलीची दुसऱयांदा या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेतही तो ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता. अँथनी क्लार्क हे या संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. निवडण्यात आलेल्या संघाचे 28 डिसेंबरपासून येथे सराव शिबिर होणार आहे. विंडीजमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात एकूण 16 संघांचा सहभाग असेल. 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱया या स्पर्धेत एकूण 48 सामने होणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचा यू-19 संघ ः हरकिरत बजवा, ऐडन काहिल, कूपर कॉनोली, जोशुआ गार्नर, आयझॅक हिगिन्स, कॅम्पबेल केलावे, कोरे मिलर, जॅक निसबेट, निवेदन राधाकृष्णन, विल्यम्स साल्झमन, लचलॅन शॉ, जॅक्सन सिनफील्ड, टोबायस स्नेल, टॉम व्हिटनी, टीग वीली. राखीव खेळाडू ः लियाम ब्लॅकफोर्ड, लियाम डॉड्रेल, जोएल डेव्हिस, सॅम रहॅले, ऑब्रे स्टॉकडेल.