प्रतिनिधी /बेळगाव
शहरात कचऱयाची समस्या गंभीर बनलेली असतानाच आता हॉस्पिटलमधील आणि आरोग्य केंद्रांतील कचरादेखील उघडय़ावर टाकण्यात येत आहे. येथील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे हॉस्पिटल्स व आरोग्य केंदे या ठिकाणी लस देण्यात येत आहे. यासह गल्लोगल्लीतही उपक्रम राबवून नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीकरण झाल्यानंतर सिरिंज आणि इंजेक्शनच्या बाटल्या उघडय़ावर टाकण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर कचरा टाकण्यात आला आहे. या कचऱयात दिवसेंदिवस वाढ होत असून संबंधित व्यक्तींनी या ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.