घटप्रभेवर मासे पकडणारी व्यक्ती बेपत्ता : शेळी, कुत्र्याचा फडशा
प्रतिनिधी /बेळगाव
बिबटय़ाचे दर्शन झाल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र, त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. त्यानंतर मात्र सदर बिबटय़ाने एका शेळीचा आणि कुत्र्याचा फडशा पाडला असून गोकाक परिसरातील घटप्रभा नदीवर मासे पकडणारी व्यक्ती बेपत्ता झाल्याने चिकोडीसह गोकाक तालुक्मयात मोठी दहशत पसरली असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
बिबटय़ाचे ताजे ठसे वनविभागाच्या अधिकाऱयांना मिळाले. त्यामुळे वन अधिकारीही खडबडून जागे झाले आहेत. घटप्रभा नदीवरील सिंगलापूर पुलावर मासेमारीसाठी गेलेला परशुराम राजू जालगार (वय 27, रा. गोकाक) हा बेपत्ता झाला आहे. त्याचा कोणताच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे बिबटय़ाने परशुराम याच्यावर हल्ला केला की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.
या बिबटय़ाने येडूर, येडूरवाडी, जुने येडूर, चंदूर, चंदूरटेक आणि मांजरी परिसरात दहशत माजवली असली तरी तो नेमक्मया कोणत्या परिसरात आहे, हे सांगणे अवघड झाले आहे.
कृष्णा नदीकाठ असल्यामुळे या परिसरात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे हा बिबटय़ा नेमका कोठे दडून बसला आहे, हे देखील समजणे कठीण आहे. वन विभागासमोर हे एक मोठे आव्हान उभे ठाकले असून वन विभागाने आता या बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी तसेच त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनीही या परिसरात गस्त वाढविली आहे. रात्रीच्या वेळी तसेच दिवसाही सावधगिरीने घरातून जनतेने बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या चार दिवसांपासून बिबटय़ाचा वावर असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. अनेकांनी बिबटय़ाचे ठसे तसेच शेळी व कुत्र्याच्या पाडलेल्या फडशाचे स्टेटस ठेवले होते. त्यावर वन विभागाने तसेच पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. मात्र, आता ताजे ठसे सापडल्यामुळे पोलीस विभागासह वनविभाग खडबडून जागा झाला आहे. बुधवारी या परिसरात दाखल होऊन पाहणी केली. वन कर्मचाऱयांसह अधिकारी दाखल झाले होते.
बिबटय़ाचे ठसे मिळाले आहेत. त्या परिसरात पाहणी करून त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला आहे. मात्र, बिबटय़ा त्या परिसरात आहे की गोकाककडे वळला आहे, हे सांगणे कठीण झाले आहे. या प्रकारामुळे मांजरी, अंकलीसह इतर गावांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या शेतीची कामे जोरदार सुरू आहेत. मात्र, बिबटय़ामुळे शेताकडे जायचे की नाही, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे.
बिबटय़ाने सध्या शेळी व कुत्र्याची शिकार केली आहे. त्यामुळे आणखीही शिकार करण्याच्या तयारीत बिबटय़ा असण्याची शक्मयता आहे. अनेकांनी शिवारातच घरे बांधून त्या ठिकाणी वास्तव्य केले आहे. त्यांची जनावरे तसेच इतर प्राणीही आहेत. त्यांना आता संरक्षणाची गरज आहे. बिबटय़ा आहे हे निश्चित झाले आहे. कारण मिळालेले ठसे हे बिबटय़ाचेच असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
चिकोडी-गोकाक तालुक्यात अधिक सापळे लावण्याची गरज
बिबटय़ाच्या शिकारीचे क्षेत्र फार मोठे असते. तो दिवसाला 15-20 किलोमीटर प्रवास करतो. त्यामुळे चिकोडीबरोबरच गोकाक तालुक्मयातही त्याने शिरकाव केल्याची शक्मयता व्यक्त होत आहे. या बिबटय़ामुळे आता साऱयांच्याच मनात घबराट पसरली आहे. सध्या शिवारातील कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे वन विभागाने चिकोडी तालुक्मयातील मांजरीसह गोकाक तालुक्मयातील काही भागांमध्ये सापळे रचण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष करून नदीकाठ परिसरात अधिक लक्ष ठेवणे देखील गरजेचे आहे.
सापळय़ात भक्ष्य
बिबटा सापळय़ात अडकण्यासाठी भक्ष्य ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी बुधवारी एका बकऱयाचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता या बकरीच्या आशेने बिबटय़ा सापडणार आहे का? हे आता पहावे लागणार आहे. मात्र, या बिबटय़ामुळे आता मोठी घबराट पसरली असून जनतेनेही सावधान होण्याची गरज निर्माण झाली आहे.