वार्ताहर/ येडूर
येथील शिवतेज सोशल फाऊंडेशनच्यावतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये नवे येडूर, जुने येडूर येथील महिला व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
दिवाळी पाडव्यादिवशी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील 230 स्पर्धकांनी आपल्या घरासमोरील अंगणात आकर्षक रांगोळी रेखाटल्या होत्या. स्पर्धेच्या निरीक्षकांनी प्रत्येक रांगोळीचे निरीक्षण करुन क्रमांक काढला. स्पर्धेतील सहभागींना प्रोत्साहन पर फाऊंडेशनच्यावतीने दिवाळी भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी संस्थापक अजय सूर्यवंशी, अध्यक्ष अमर बोरगावे, दीपक इनामदार, मुकूंद जाधव, श्रीकांत बेडगे, दिनेश येडूरे, प्रशांत सावंत, अनिल फाकडे, राजू कोळी, दत्ता सूर्यवंशी, सुनील जडे, इरगौडा पाटील, अविनाश सूर्यवंशी, निळकंठ फुलारे, बसगौडा पाटील, श्रीकांत कोकणे, प्रकाश कोकणे, संतोष पाटील, विनायक जाधव, बाबु बेडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.