कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर विमानतळ, करवीर एमआयडीसी, डेस्टिनेशन कोल्हापूर, राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण यासारख्या नव्या प्रकल्पांवर प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करत असून, येत्या चार वर्षात कोल्हापूर हे पुण्या-मुंबईबरोबरच व्यापार उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनणार आहे असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्हायब्रंट महाएक्सपो 2022 हे प्रदर्शन 15 ते 18 एप्रिल या कालावधीत शाहूपुरी जिमखाना मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष असून,.या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे अनावरण प्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. येथील रेसिडेन्सी क्लब येथे हा कार्यक्रम झाला.
कोल्हापूर चेंम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, जनसुराज्य शक्ती युवाचे अध्यक्ष समित कदम, कोल्हापूर इंजिनियरीग असोसिएशन सचिन मेनन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल आणि हातकंणगलेचे अध्यक्ष संजय पेंडसे,गोशिमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागलचे प्रेसिडेंट दिपक पाटील,इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशनचे प्रेसिडेंट रवींद्र पाटील,क्रीडाई कोल्हापूरचे प्रेसिडेंट विद्यानंद बेडेकर,वेस्टर्न महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचे संचालक .सत्यजित भोसले, कोल्हापूर चेंबर ऑफ कामर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने ,प्रदीपभाई कपाडिया आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूरमध्ये चांगले अनेक नवनवीन प्रोजेक्ट आणले जात आहेत यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटक येण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालू आहेत. कला व सांस्कृतिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात शिवाय इन्फ्रास्ट्रक्चर व भौगोलिक दृष्टय़ाही सुविधा देऊन कोल्हापूरला पुढे नेणे आवश्यक आहे. यासाठी नव्या पिढीला सहभागी करून मार्केटिंग करणे गरजेचे आहे असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी ललित गांधी, संजय शेटे, रविंद्र चिरपुटकर, विद्यानंद बेडेकर, सत्यजित भोसले, समीत कदम यांची भाषणे झाली.
सूत्रसंचालन ताज मुल्लानी तर आभार हरिषभाई पटेल यांनी मानले. या प्रदर्शनात एकूण 100 कंपन्यांचा सहभाग आहे. या प्रदर्शनासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशन,कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकलंगले, डेस्टिनेशन कोल्हापूर आदींचे सहकार्य मिळाले आहे. रिलायन्स पॉलिमर्स प्रदर्शनाचे स्पॉन्सर असून, हाऊस ऑफ इव्हेंट सुजित चव्हाण यांनी या प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.