डिचोली / प्रतिनिधी
सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात सरकारतर्फे समाधानकारक नोकऱया उपलब्ध होऊ वकल्या नाहीत याची जाणीव आपल्यालाही असून येणाऱया दोन वर्षांच्या कार्यकाळात सरकारी तसेच खाजगी स्थरावर मोठय़ा प्रमाणात नोकऱया निर्माण करण्याचा सरकारचा मनोदय आहे. सुमारे 8 हजार नवीन नोकऱयाच्या येणाऱया दोन वर्षांच्या काळात जाहिराती निघणार आणि बेरोजगारांना रोजगारांची संधी निर्माण होणार. त्याचप्रमाणे मोपा विमानतळावरून पहिले विमान हे येणाऱया 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उडणार, हा विमानतळ सुरू झाल्यावर गोव्यातील सुमारे 20 हजार गोमंतकीय बेरोजगारांना सरळ रोजगार निर्माण होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मये येथे केले.
मये मतदारसंघाचे जिल्हा पंचायत उमेदवार शंकर चोडणकर यांच्या प्रचारासाठी मये पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मयेचे आमदार प्रविण झांटय़?, उमेदवार शंकर चोडणकर, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मयेच्या सरपंचा उर्वी मसूरकर, उपसरपंच विश्वास चोडणकर, पंचसदस्य सीमा आरोंदेकर, विनीता गावकर, तुळशीदास चोडणकर, संतोष गडेकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा आरती बांदोडकर आदींची उपस्थिती होती.
पंधराव्या वित्त आयोगाकडून दरवषी मिळणार 15 कोटीचा निधी.
या राज्यातील जिल्हा पंचायतींना ज्यादा अधिकार व निधी देण्यासाठी सरआर विचाराधीन असून यावषी पंधराव्या वित्त आयोगाकडे सरकारने केलेल्या शिफखरसीनुसार उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींना दरवषी 15 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामुळे या कार्यकाळात एखाद्या जिल्हा पंचायत सदस्याने केलेली विकासकामे येणाऱया काळात दुप्पटीने करायला संधी मिळणार आहे. सध्या राज्यात व केंद्रातही भाजपचेच सरकार असल्याने या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मयेत शंकर चोडणकर हेच भाजपचे अधिकृत उमेदवार.
मते मतदारसंघात भाजपतर्फे शंकर चोडणकर हेच अधिकृत पक्षाचे उमेदवार असून अनेक उमेदवार भाजप पक्षाचे तसेच आपलेही नाव घेऊन प्रचार करीत आहेत. या अपप्रचाराला लोकां?नी बळी पडू नये. या पक्षात दिलेली उमेदवारी हि त्या व्यक्तीला दालेले प्रथम स्थान आहे. आणि त्यासाठी पक्ष कार्य करीत असतो. या पक्षात दुय्यम स्थान कोणाला नाही. म्हणून मयेतील जनतेने विरोधकांच्या दिशाभूल करणाऱया प्रचाराला बळी पडू नये. पक्षाने सर्वांना भरभरून दिलेले आहे. मात्र काळानुसार कोणाला जरा बाजुला ठेवले याचा अर्थ पक्षाशी फारकत घेऊन वेगळा मार्ग धरणे, असे होत नाही.
ग्रामीण भागांच्या विकासासाठी भाजपलाच मतदार द्या – प्रविण झांटय़?.
राज्यात तसेच केंद्रातही भाजपचे सरकार असून राज्याचे युवा मुख्यमंत्री राज्याच्या हितासाठी वावरत आहे. त्यामुळे येणाऱया काळात या राज्याचा मोठय़ा प्रमाणात विकास होणार हे निश्चित आहे. मयेतील मये तलाव विकसित होत असताना या गावात तसेच परिसरातील भागांचा ग्रामीण पातळीवर पर्यटन विकास साधण्यासाठी सरकारी पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. चोडण पुल येणाऱया दोन वर्षात पूर्ण होणार असून मयेत रेल्वे स्थानक येणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच येणाऱया काळात गोव्यातील खाणी सुरू होणार असून राज्यासमोरील अनेक विषय चालीस लागणार आहे, असे यावेळी मयेचे आमदार प्रविण झांटय़? यांनी म्हटले.
मयेच्या इतिहासात मागील कार्यकाळात सर्वात जास्त कामे – शंकर चोडणकर.
मागील निवडणुकीत पक्षाने ठेवलेला विश्वास सार्थ ठरविताना निवडून येऊन लोकांचाही विश्वासाला पात्र ठरण्याचा आपण प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत या मतदारसंघाचा मोठय़ा प्रमाणात विकास झालेला असून अशा प्रकारचा विकास यापूर्वी कधीही झालेला नाही. त्याची पावती म्हणून पक्षाने पुन्हा आपल्याला उमेदवारी दिली आहे. कार्यकर्ते व मतदारांच्या बळावर आपण हि उमेदवारी स्विकारली असून मयेत आपला विजय मतदारांनी निश्चित केला आहे. विकास हि प्रक्रिया सरकारच्या बळावर होत असते त्यासाठी सरकारच्या समर्थनाला पाठिंबा देणे गरजेचे आहे. असे उमेदवार शंकर चोडणकर यांनी म्हटले.
मोठय़ा आघाडीने भाजपचा उमेदवार निवडून आणू – उर्वी मसूरकर.
मये मतदारसंघातील मोठय़ा प्रमाणात विकासकामे जिल्हा पंचायत मार्फत झालेली असून या मतदारसंघात आणखीनही विकास साधण्यासाठी या मतदारसंघात जास्तीत जास्त मतांची आघाडी घेऊन निवडून आणणे गरजेचे आहे, असे आवाहन सरपंचा उर्वी मसूरकर यांनी केले.
स्वागत पंचसदस्य तुळशीदास चोडणकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विश्वास चोडणकर यांनी मानले.