अनेक सुविधा मिळतात मोफत
जगभर हिंडण्याचा छंद बाळगणारे आणि विदेशात स्थायिक होण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. जगात असे अनेक देश आहेत, जेथे स्थायिक होण्यासाठी लोकांना पैसे देण्यात येतात. या देशांमधील सरकार लोकांना स्वतःच्या देशात बोलाविण्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. येथील सरकार स्वतःच्या देशाच्या विकासासाठी अशाप्रकारचे पाऊल उचलत असते.
न्यू हेवन सिटी
हा देश स्वतःच्या भूमीत लोकांना वसविण्यासाठी पैसे देतो. याचबरोबर तेथे स्थलांतरित होणाऱया लोकांना अनेक सुविधा मिळतात. जर कुणी येथे घर खरेदी केल्यास सरकार त्याला 10,000 डॉलर्स (7 लाख रुपये) देते. या देशात स्थायिक झाल्यावर लोकांच्या मुलांना मोफत शिक्षण प्रदान केले जाते.
थायलंड
स्वतःच्या देशात स्थायिक होण्यासाठी लोकांना पैसे देणाऱया देशांमध्ये थायलंडचेही नाव सामील आहे. आशियातील हा देश वेगाने विकास करतोय. थायलंड स्वतःच्या देशात व्यापार आणि संस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न करतोय. थायलंडकडून अमेरिका आणि कॅनडाच्या लोकांना स्थायिक होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा देश जगातील अन्य देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. तेथे उत्तम आरोग्य सुविधा स्वस्त दरात उपलब्ध होते.
अलास्का
अमेरिकेतील अलास्का शहर देखील स्थलांतरासाठी चांगला पर्याय आहे. मागील काही वर्षांमध्ये तेथे स्थायिक होणाऱया लोकांची संख्या वाढली आहे. येथे राहणाऱया लोकांची संख्या वाढावी, जेणेकरून येथील विकास होईल या दृष्टीने अमेरिकेच्या प्रशासनाचा प्रयत्न आहे. येथे स्थायिक झाल्यास सरकारकडून 2 हजार डॉलर्स देण्यात येतात. तेथे घरही अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होते.