प्रतिनिधी / शाहुवाडी
येळाणे तालुका शाहूवाडी येथे एस टी स्टॅन्ड नजीकच्या नागरी वस्तीत खवल्या मांजराचा शिरकाव झाल्याने नागरिक यांच्यात घबराट निर्माण झाली होती अचानक आलेल्या खवल्या मांजरला बघताच नागरिक भयभीत झाले तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून वन विभागाच्या कर्मचाऱ्यानी खवल्या मांजर ताब्यात घेतले.
रात्री साडेनऊच्या दरम्यान अचानक एसटी स्टँड परिसरातुन खवल्या मांजराने शिरकाव केला. वेगळ्या प्रकारचा प्राणी दिसल्याने येथील युवकांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. भीतीने ते मांजर एका ड्रममध्ये जाऊन बसले. अचानक आलेल्या या खवल्या मांजराची माहिती मिळताच बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन सदर खवल्या मांजराला आपल्या ताब्यात घेतले.