प्रतिनिधी/ येळ्ळूर
शिवाजीनगर येळ्ळूर येथील रहिवासी हवालदार जोतिबा मनोहर पाटील (वय 43) यांचे सीओडी कानपूर (उत्तर) येथे सेवा बजावताना गुरुवार दि. 31 रोजी निधन झाले. त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी येळ्ळूर येथे आणण्यात आला. त्यानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी येळ्ळूर गावातील व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जोतिबा यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे.