प्रतिनिधी / येळ्ळूर
येळ्ळूर ग्राम पंचायतीवर भगवा ध्वज फडकला. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षही म. ए. समितीचाच झाला. अध्यक्षपदी सतीश पाटील तर उपाध्यक्षपदी लक्ष्मी मासेकर यांची निवड झाली. त्यानंतर या सर्व सदस्यांनी तरुण भारतला भेट दिली. संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी तरुण भारतच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सदस्य रमेश नारायण मेणसे, पिंटू चौगुले, राकेश बाबुराव परीट, परशराम लक्ष्मण परीट, म. ए. समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सदस्या सोनाली श्रीकांत येळ्ळूरकर, अनुसया परीट, मनीषा मनोहर घाडी, वनिता समीर परीट, सुवर्णा कृष्णा बिजगरकर, शालन तानाजी पाटील, पार्वती जयसिंग रजपूत, रूपा भीमराव पुण्यान्नावर आदी उपस्थित होते.