प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूरमधील जेष्ठ नागरिक आणि निवृत्त जवान रामचंद्र नागोजी पाटील यांना 103 वर्षे जानेवारी 18 रोजी पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
राजेंद्र कलघटगी (101 वर्षे) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संघटनेचे सेपेटरी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्यासह सैनिक सोसायटीचे चेअरमन बाबुराव मुरकुटे, नेताजी को-ऑप सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील, मनोहर गिंडे, एन. आर. पाटील हे उपस्थित होते.